वादळ

वादळाने किती उठावे एखाद्याच्या आयुष्यात 
कधी उठावे कशासाठी उठावे काहीच कळत नाही 
जगावे कसे राहावे कसे बोलावे कसे काहीच समजत नाही 
वादळातूनच शिकावे की गमवावे हेच उमगत नाही 
कधी फुलावे कधी कधी बसावे फुलपाखराने त्या फुलावरी 
वादळातून बाहेर पडताना आयुष्य होते अनावरी
कसे आवरावे कसे सावरावे काहीच उमगत नाही 
 स्वतःच स्वतःच्या आयुष्यात आशेचा किरण शोधूनी त्या किरणामागे धावत राहते 
इतरांचे दुःख पाहता आपले काहीच वाटत नाही 
शेवटी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते सर्वांना बळ द्यावे शक्ती द्यावे या आयुष्यातील वादळांवर  मात करण्यासाठी.

Comments

Popular posts from this blog