Posts

Showing posts from March, 2025
                        माझे दादा  माझे प्रेरणास्थान माझे दादा  माझे फुलणारे आयुष्य माझे बाबा म्हणजे माझे दादा.  हळुवारपणे मायेची पाखर घालून मला फुलवणारे माझे दादा  संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करणारे माझे दादा  फक्त त्यांना आठवण्याने सुद्धा मार्ग सापडतो असे माझे दादा  वादाने विषय न संपवता शांततेने कसा गुंता सोडवतात माझे दादा  सर्वांच्याच आयुष्यात सुखाची चादर ओढणारे माझे दादा  निस्वार्थ भावनेने सेवा करणारे माझे दादा  तसेच संस्कार इतरांवर व आम्हावर लागणारे माझे दादा  माझे दादा विनायकराव कृष्णा शेळके पाटील लोणंद एक प्रतिष्ठित आणि निस्वार्थी भावनेने काम करणारे व्यक्ती.  भाग्यवान आहे मी ज्यांच्या पोटी जन्म घेतला असे माझे दादा  शतशा आभार मानेल त्या परमेश्वराचे ज्यांनी मला दिले माझे दादा.  खूप ख्याती बोलावी असे वाटावे असे माझे दादा.  मनापासून शतकोटी आभार मानावे असे माझे दादा माझे दादा माझे दादा.
    वादळ वादळाने किती उठावे एखाद्याच्या आयुष्यात  कधी उठावे कशासाठी उठावे काहीच कळत नाही  जगावे कसे राहावे कसे बोलावे कसे काहीच समजत नाही  वादळातूनच शिकावे की गमवावे हेच उमगत नाही  कधी फुलावे कधी कधी बसावे फुलपाखराने त्या फुलावरी  वादळातून बाहेर पडताना आयुष्य होते अनावरी कसे आवरावे कसे सावरावे काहीच उमगत नाही   स्वतःच स्वतःच्या आयुष्यात आशेचा किरण शोधूनी त्या किरणामागे धावत राहते  इतरांचे दुःख पाहता आपले काहीच वाटत नाही  शेवटी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते सर्वांना बळ द्यावे शक्ती द्यावे या आयुष्यातील वादळांवर  मात करण्यासाठी.